लंडनची आज्जी


एकदा मी व माझी पत्नी महात्मा फुले मंडईत भाजी आणायला गेलो होतोएका कोपऱ्यावर एक चांगलीच वयस्कर आजी थोडेसेच भोपळे व आंबेहळद घेऊन बसली होतीभोपळा चांगला दिसलासौ.ने विचारले,

आजी भोपळा कसा दिला?”

“ पन्नास रुपयाला सगळा घ्याथोडाच ऱ्हायलाय

“ नकोपाव किलो द्या

“ न्या कीदोन दिवस खाल.”

आज्जीखाणारी आम्ही दोघंचनाही खपत जास्त

“ अरेरेदोघंचमुलं-बाळं न्हाईत वाटतं

“ तसं नाहीती असतात अमेरिकेलाइथे आम्ही दोघंच असतो

अस्स व्हय” आजी म्हणाल्या.

 

त्यानंतर जे त्या बोलल्या त्याने आमची विकेटच उडाली.

माजा नातू पण इंग्लंडला असतो.”

 **

नवरात्रात अष्टमीला भोपळ्याचे घारगे करायचे होतेमंडईत गेलो होतोआमची पावले आजींच्या कोपऱ्याकडे वळली.

अरेच्चाआजी नव्हत्याकोपरा रिकामा होतामनात शंकेची पाल चुकचुकलीजरा कचरतच शेजारच्या भाजीवाल्याला विचारले,

का होइथं बसणाऱ्या आजी दिसत नाहीत?”

अहोत्या गेल्यात नातवाकडेत्यांचा नातू इंग्लंडला असतोत्याच्याकडे.”

 

फार मस्त वाटलेआपली ही आजी – नऊवारी नेसणारीडोक्यावरून पदर घेणारीआज कदाचित बकिंगहॅम पॅलेसचा चेंज ऑफ गार्ड’ पहात असेलकिंवा लंडन आय च्या चक्रात बसून वेस्टमिन्स्टर ब्रिजहौस ऑफ कॉमन्स पाहेलनातवाचं वैभव पाहून परत येईल.

 

पुढच्या वेळेला मंडईत भेटली की म्हणेल, “इंग्लंडची राणी काय दिसली न्हाई बगाताईभोपळा बेस हायेघेऊन टाका

 

सुधीर कुलकर्णी


टिप्पण्या