पोस्ट्स

लंडनची आज्जी

एकदा मी व माझी पत्नी महात्मा फुले मंडईत भाजी आणायला गेलो   होतो .  एका कोपऱ्यावर एक चांगलीच वयस्कर आजी थोडेसेच भोपळे व आंबेहळद घेऊन   बसली होती .  भोपळा चांगला दिसला .  सौ . ने विचारले , “ आजी भोपळा कसा दिला ?” “  पन्नास रुपयाला सगळा घ्या .  थोडाच ऱ्हायलाय ” “  नको .  पाव किलो द्या ” “  न्या की .  दोन दिवस खाल .” “ आज्जी ,  खाणारी आम्ही दोघंच ,  नाही खपत जास्त ” “  अरेरे ,  दोघंच ?  मुलं - बाळं न्हाईत वाटतं ” “  तसं नाही ,  ती असतात अमेरिकेला .  इथे आम्ही दोघंच असतो ” “ अस्स व्हय ”  आजी म्हणाल्या .   त्यानंतर जे त्या बोलल्या त्याने आमची विकेटच उडाली . “ माजा नातू पण इंग्लंडला असतो .”  ** नवरात्रात अष्टमीला भोपळ्याचे घारगे करायचे होते .  मंडईत गेलो होतो .  आमची पावले आजींच्या कोपऱ्याकडे वळली . अरेच्चा !  आजी नव्हत्या .  कोपरा रिकामा होता .  मनात शंकेची पाल चुकचुकली .  जरा कचरतच शेजारच्या भाजीवाल्याला विचारले , “ का हो ,  इथं बसणाऱ्या आजी दिसत नाहीत ?” “ अहो ,  त्या गेल्यात नातवाकडे .  त्यांचा नातू इंग्लंडला असतो ,  त्याच्याकडे .”   फार मस्त वाटले .  आपली ही आजी  –  नऊवारी नेसणारी ,  डोक